रक्तवीरच्या अविरत सेवेची यशपूर्ती....💉🩸
जिल्ह्यातील सक्रिय रक्तवीरांपैकी काही नेहमीच गरजूंची मदत करीत असतात. सामाजिक भावनेतून घडलेली सेवा मानवता स्तर उंचावत असतात. श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील गरजू रुग्णासाठी रक्तदाते प्रविण दादा भानखेडे आणि रक्तदाते वैभव ताटेवार यांनी रक्तदान करून सेवा सक्रीयतेची पावती दिली.
एका जीवाचे महत्व लक्षात घेता या दात्यांनी केलेल्या कृतीतून पुण्यकर्माचे वाटेकरी होऊन रुग्णाला आनंद दिला आहे. हेच कार्य निःशंक रक्तवीरच्या अविरत सेवेची यशपूर्ती ठरली...
~प्रफुल्ल भोयर
#Bravery_Raktveer