स्वातंत्र्यदिनी महसूल विभागाकडून अंगणवाडी सेविकेचा सन्मान
यंदा भारतभर 76 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनी वीरांच्या स्मृतींना उजाळा दिला जाऊन त्यांचा गौरव केला जातो.
या स्वातंत्र दिनाच्या शुभ औचित्यावर तहसील कार्यालय महसूल विभाग झरी जामनी यांचे हस्ते अंगणवाडी सेविका श्रीमती नंदा गणपत भोयर यांचा सन्मान करण्यात आला.
घरोघरी जाऊन मतदार जनजागृती आणि आपले कार्य उत्कृष्टपणे पार पाडून महसूल प्रशासनास बहुमोल मदत केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
वणी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून मतदारांच्या सर्व्हेक्षणाचे १००% काम विहित मुदतीचे आत करून उत्कृष्ठ कामगिरीसाठी हा सन्मान उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी वणी विधानसभा यांचेकडून श्रीमती नंदा गणपत भोयर यांना बहाल करण्यात आला.
यावेळी माननीय तहसीलदार श्री महेश रामगुंडे साहेब, पाटण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील साहेब, तालुका आरोग्य अधिकारी श्री. मोहन गेडाम साहेब, मतदान अधीकारी, तहसील कार्यालयाचे अधिकारी तसेच कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.