वाढदिवशी केले रक्तदान वाचविले रुग्णाचे प्राण
मानवतेच्या संवर्धनासाठी केलेला उपाय असेही रक्तदानास म्हंटले जाते. गरजूंना रक्तदान करून कित्येकांच्या जीवनात नवचतनेने पुनर्जीवन मिळते. श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथील दवाखान्यातील श्याम बांते या पेशंटसाठी आकाश जीवतोडे या युवकाने आपल्या वाढदिवशी रक्तदान करून मानवतेच्या संवर्धनासाठी मोठी मदत केली आहे. जिल्ह्यात रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत असल्याचे आपल्याला पहावयास मिळते, कुणाचाही रक्ताविना जीव जाऊ नये अशी म्हणणारी बरीच मंडळी स्वतःहून रक्तदान करण्यासाठी पुढे येतात. वाढदिवसाचे औचित्य मात्र सर्वांसाठी अगत्याचे आहे. वाढदिवसाच्या शुभ प्रसंगी आकाश जीवतोडे यांनी यांनी स्वैच्छिक रक्तदान करून रुग्णास मोठी मदत केली आहे.
- प्रफुल्ल भोयर
#Bravery_Raktveer