15 March 2023
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रफुल भोयरच्या "विश्वात्मक औदार्य" चे विमोचन...
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रफुल भोयरच्या विश्वात्मक औदार्य चे विमोचन
बळीराजा चेतना भवन येथे ग्राहक दिन साजरा
ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून जिल्हा प्रशासनाकडून जागतिक ग्राहक दिन माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली १५ मार्चला साजरा करण्यात आला. यावेळी ग्राहकांचे हक्क व कर्तव्य याविषयी मोलाचे मार्गदर्शन ग्राहकांना होण्यासाठी विविध विषयांवर मान्यवरांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावरील मान्यवरांनी ग्राहक संरक्षणाबाबत विस्तृत्व व सखोल माहिती दिली. सुरक्षिततेचा हक्क तसेच वस्तू व सेवा या संबंधी माहिती विचारण्याचा हक्क, निवड करण्याचा हक्क, बाजू ऐकून घेतली जाण्याचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क, लोक शिक्षणाचा हक्क, यानुसार नवीन व जुना ग्राहक संरक्षण कायदा याविषयी ज्ञान उपस्थितांना झाले.
सदर कार्यक्रमात "विश्वात्मक औदार्य" या श्री वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी यवतमाळ यांची गौरवगाथा मांडणाऱ्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. सोबतच संकल्प फेडरेशन यवतमाळ यांच्या सामाजिक कार्यासाठी सत्कार करण्यात आला.
बचत भवन येथे आयोजित केलेल्या जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात विश्वात्मक औदार्य या विशेष उल्लेखनीय ठरलेल्या पुस्तकाचे लोकार्पण सोहळा पार पडला.
श्री प्रफुल भोयर यांनी शाळकरी वयापासून मानवतेसाठी जगण्याच्या सोज्वळ हेतूतून रक्तदान सेवेचा वसा हाती घेतला आणि निरंतर लोकशिक्षणासाठी कार्य करत अनेक रुग्णाचे प्राण वाचवले. फलस्वरूप त्यांच्या कार्याला माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे साहेब तसेच जिल्हा प्रशासन यवतमाळ यांची मोलाची साथ लाभली. या अनुषंगातून प्रफुल यांच्या कल्पनेतून साकारलेली कलाकृती "विश्वात्मक औदार्य" हा उत्कृष्ट नमुना म्हणून नावारूपास आला. या प्रेरणेतून कित्येक तरुण रक्तदानास समोर आले. १५ मार्च जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पुस्तकाच्या लोकार्पणाचा सोहळा बळीराजा चेतना भवन यवतमाळ येथे थाटात संपन्न झाला. रक्तदान क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन कार्य करणारा युवक म्हणून प्रफुल्लची जिल्ह्यात असलेली ओळख यामुळे अजूनच भक्कम झाली. यामुळे अनेक गरजू गरीब रुग्णांना नक्कीच फायदा होईल.
यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब, तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, भुमी अभिलेख चे जिल्हाअधिक्षक शिवदास गुंड, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांताध्यक्ष डॉ. नारायणराव मेहरे, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष राजेंद्र निमोदिया, अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडकर, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त श्रीमती सविता दातीर, तहसीलदार श्री कुणाल झाल्टे, वैद्यमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक श्री पोहनकर, वजन मापे विभागाचे उपनियंत्रक के एल रिठे हे उपस्थित होते. उत्कृष्ठ संचलनामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. यावेळी विविध ग्राहक, जेष्ठ नागरिक, अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
--------------------------------
कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....
प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता ◆ कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...
-
जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रफुल भोयरच्या विश्वात्मक औदार्य चे विमोचन बळीराजा चेतना भवन येथे ग्राहक दिन साजरा ग्राहकाला केंद्रस्थ...
-
यवतमाळ साहित्य मंच तर्फे प्रफुल्लचा गौरव... रक्तदानाच्या उल्लेखनिय कामगिरीसाठी दिला पहिला सामाजिक पुरस्कार यवतमाळ जिल्हा साहित्य...