वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा नितीन दादा....🎉🎂🌺
खरंतर आज मी अशा व्यक्तिमत्वाविषयी बोलतोय जे सर्वोत्तम हेतू घेऊन येथील राजकारणात उतरले.
एवढ्या कमी वयात परिस्थितीला न जुमानता, समाजाची बंधन झुगारून त्यांनी टाकलेल मोलाचं पाऊल यशस्वी ठरते आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यावरही त्यांच्या मनात एक सल कायमचीच होती ती म्हणजे लोकांच्या अंधःकारमय जीवनात प्रकाश आणण्यास आपला हातभार असावा म्हणूनच ते आज क्रांतीच्या त्या शिडीवर उभे आहे जिथून ज्ञानाचा लख्ख प्रकाश पसरलेला दिसत आहे. सोबतच प्रगतीच्या लाख वाटाही. कष्टाच्या शब्दावर प्राक्तनाची शिरोरेषा असो वा नसो पण ते ध्येयाकडे पोहोचल्याचे मला स्पष्ट दिसत आहे.
तसा संघर्ष ही कधी सरणारी बाबच नाही तो श्वासासोबत अखंड सुरूच राहीतो. पण संघर्षाची व्याख्या लिहिणारे दादा सन्मानास पात्र आहे.
समाजाचा विकास नवी पहाट घेऊन उदयास यावा ही संकल्पना घेऊन समाज सेवेस उतरलेले नितीनदादा स्वतःला समाजास वाहून नगरसेवक बनले. त्यांच्या चांगल्या कार्याने आज सर्वच यवतमाळकर त्यांची प्रेरणा घेतात. परिस्थिती कशीही असो पण आपण मात्र सदैव तयार. संकट असो,आनंद असो की हर्षोल्हास दादांनी घेतलेला निर्णय आजपर्यंत सर्वमान्यच ठरला आहे. दादांच्या आयुष्याचाच अर्थ एवढा व्यापक आहे की त्यांच्या प्रत्येक स्पंदनात मानवता सामावलेली आहे. काही मानसांत नाते जरी रक्ताचे नसले तरीही माणुसकीच्या नात्याने रक्त देण्यासही मागेपुढे विचार न करणारे महान विचार नितीनदादांकडे आहे.
तयार झाला हा/असा नेक नेता/
जणू एक दाता/विधाताच।।
चढविली तुम्ही/क्रांतीची शिडी/
रडणारी पिढी/नष्ट झाली।।
संकटही असो/ वा असो आनंद/
दादा नित्य असे/स्थितप्रज्ञ।।
गाजविले त्यांनी/ राजकीय क्षेत्र/
उघडे त्रिनेत्र/ सर्वकाळ।।
चळवळीतून/व्यापकतेकडे/
सत्कर्मची घडे/हातुनही।।
दादा तुम्ही असे/ समाजा आधार/
क्रांतीचा निर्धार / घेऊनिया।।
सामर्थ्य तुमचे/ ही श्रेष्ठ भावना
सांगते प्रेरणा /प्रफुल हा।।
● शुभेच्छुक / शब्दांकन :- प्रफुल्ल भोयर / ७०५७५८६४६८