16 December 2022

"विश्वात्मक औदार्य" शब्दयात्रा प्रकाशन प्रदर्शनीत उपलब्ध...

 "विश्वात्मक औदार्य" शब्दयात्रा प्रकाशन प्रदर्शनीत उपलब्ध...



🌱✨🌺

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग

ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेल्या यवतमाळ ग्रंथोत्सव 2022 मधील प्रदर्शनीत प्रफुल्ल भोयर या प्रसिद्ध लेखकाचे आपल्या सर्वांच्या कार्याला समर्पित "विश्वात्मक औदार्य" हे पुस्तक अभ्यंकर कन्या शाळा यवतमाळ येथे आज सुरू असलेल्या कार्यक्रमात उपलब्ध आहे.


◆ शब्दयात्रा पुस्तकालय

स्थळ :- अभ्यंकर कन्या शाळा यवतमाळ


प्रफुल भोयर - 7057586468






06 December 2022

चिकणी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न...

         ◆ रक्तदान शिबिर


       महापरिनिर्वाण दिन व श्री दत्त जयंती च्या औचित्यावर जनहित युवा बहुउद्देशीय संस्था चिकणी यांचे विद्यमाने दिनांक 6 डिसेंबरला जिल्हा परिषद शाळा चिकणी येथील प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

        यावेळी शिबिरात तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. रक्तसंकलनासाठी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची रक्तपेढी होती. जिल्ह्यातील रक्ताची वाढती मागणी आणि पडणारा तुटवडा पाहता रक्तदाते वाढवणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन महापरिनिर्वाण दिन तथा दत्तजयंती निमित्त शिबीर आयोजन केले होते.

        शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुनील आडे, रक्तमित्र प्रफुल भोयर, ऋषिकेश टाटर, सुरेश राठोड, राम जाधव, सचिन राठोड, सागर वलके,आशुतोष पाढेन, अजय चव्हाण, दत्ता गजरे, कुणाल राठोड, संचित कुत्तरमारे, लेखन राठोड, करण ठाकरे, यांनी मेहनत घेतली.























04 December 2022

यवतमाळ जिल्हा साहित्य मंच द्वारा आयोजित साहित्य संमेलनात कविता सादरीकरण केल्याबद्दल सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन मला गौरविण्यात आले...



सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मला देताना अवधुतवाडी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक केदारे सर...

                                           ✨🌺🌱

     यवतमाळ जिल्हा साहित्य मंच द्वारा आयोजित साहित्य संमेलनात कविता सादरीकरण केल्याबद्दल सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन मला गौरविण्यात आले...

😊🙏🏻

साहित्याच्या मांडीयाळीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व मा. शिक्षण मंत्री श्री पुरके साहेब यांच्या समवेत...
✨🌺



कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...