रक्तदानाच्या संकल्प पुर्तीने युवकाने केला वाढदिवस साजरा
◆ काळाच्या ओघात मानवाची मदतगार वृत्ती संपुष्टात येत असल्याच सर्वत्र बोलल्या जाते. वेळेला महत्त्व देऊन कार्य करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आजही मदत मागणाऱ्या हातापेक्षा मदतीसाठी उचलले जाणारे हात कमी नाहीत.
वाढदिवशी रक्तदानाचा संकल्प करणारे नियमित रक्तदाते पवन चिंचुलकर यांनी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीत वाढदिवसानिमित्त स्वैच्छिक रक्तदान करुन एका निष्पाप जिवाची मालवणारी ज्योत तेजवीत राहावी यासाठी प्रयत्न केले त्यांच्या या अमूल्य सात्विक दानाचा उपयोग अपघात ग्रस्त, तातडीच्या अवघड व मोठ्या शस्त्रक्रिया, बाळंतपण होणारा अतिरक्तस्राव, थॅलेसिमिया बालक या व अशा अनेक रुग्णांना होणार आहे.
रक्तदान संकल्पपूर्तीने युवकाचा वाढदिवस साजरा https://www.tarunbharat.net/Encyc/2021/11/24/Celebrate-the-youth-s-birthday-with-blood-donation.html