मुकुटबन येथे रक्तदान शिबिर संपन्न
पोलीस निरीक्षक जाधव सर यांच्या रक्तदानाने शिबिराची सुरुवात
अखंड नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्री उत्सवानिमित्त जय जगदंबा दुर्गा उत्सव मंडळ मुकुटबन यांनी दि 12आक्टोबर ला रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी मुकुटबन पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक जाधव सर यांच्या रक्तदानाने शिबिराची सुरुवात झाली.
खेड्यातील तरुणांना रक्तदानाचे महत्व कळावे आणि रक्तदानाची जनजागृती होऊन तरुणांना प्रेरणा मिळावी यासाठी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मुकुटबन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला तालुक्यातील युवकांचा प्रतिसाद मिळाला. श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी यवतमाळ चे वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक जानकर सर, राहुल भोयर आणि चमू यांच्या माध्यमातून शिबिराची सांगता झाली.
शिबिराला ग्राम प्रशासन, रक्तविर बहुउद्देशीय संस्था , नेहरु युवा केंद्र तसेच श्री. राम नवमी आयोजन समिती मुकुटबन यांचे विशेष सहकार्य मिळाले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्रावण देशमुख, अतुल विधाते, गणेश मुद्दमवार, प्रियल पथाडे, प्रफुल भोयर आणि ग्रामवासी यांनी प्रयत्न केले.