07 January 2021

"रक्तविर" चा प्रफुल करतोय रक्तदान जनजागृती....

                      
। " मानवतेला स्मरुया ।। रक्तदान करुया " ।।

यवतमाळ :  गरजू व्यक्तींना रक्तदान करणे आधुनिक स्वास्थ्य देखभाल प्रणाली मध्ये मानवतेच्या महत्वपूर्ण भाग बनला आहे. स्वैच्छिक रक्तदान कोणत्याही मनुष्यासाठी वास्तविक मानवता आहे. कारण रक्तदान अनेक जीवांना वाचवू शकतो. हे लक्षात घेऊन रक्तदानाविषयी समाजात पसरलेल्या गैरसमजूती दूर करुन रक्तदाते वाढविण्यासाठी रक्तविर बहुउद्देशीय संस्थेच्या प्रफुल भोयर यांनी रक्तदान जनजागृतीची चळवळ उभारली आहे.
        त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि त्यांच्याशी जोडलेल्या वेगवेगळ्या लोकांमधील सहकार्यासाठी प्रयत्न केला आहे. रक्तदान करण्यासाठी सुरक्षित रक्ताची गरज या विषयावर सार्वजनिक जागरूकता वाढविण्यासाठी सहज संधी उपलब्ध केल्या आहेत. शिबिरे राबविणे, रक्तदाते तयार करणे, कवितेच्या माध्यमातून जनजागृती व रक्तदानाचे महत्त्व सांगणे, गरजु, गरीब रुग्णांना मोफत रक्त व रक्तदाते उपलब्ध करुन देणे या माध्यमातून प्रफुल भोयर हे रक्तदान क्षेत्रात अग्रेसर आहे.
        लोकांमध्ये मानसिक बदल घडवून आणण्याची बाब जेव्हा समोर येते तेव्हा तरुणांना जागरुक करणे, शिक्षित करणे आणि संवेदनशिल बनवणे हीच भूमिका महत्त्वाची ठरते. तातडीच्या वेळी माणुसकीच्या स्वैच्छिक रक्तदान करण्याचा सामाजिक प्रघात निर्माण होणे गरजेचे आहे. प्रफुल भोयर यांच्याकडून रक्तदानाचा विविध पैलूंबद्दल संवेदनशील बनवणारे कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
          त्यानिमित्ताने प्रफुल भोयर यांनी नवीन रक्तदाते तयार करणे, रक्तदानाविषयी जनजागृती करणे, रक्तदानास प्रोत्साहित करणे, रक्तदान केलेल्यांना अभिवादन करणे, त्यांना आत्मसन्मान मिळवून देणे ही मोहीम हाती घेतली आहे.

आवाहन- रक्तदान करा...🇮🇳

         यवतमाळ जिल्हा रक्तपेढी ग्रुप च्या सर्व सदस्यांना आवाहन करण्यात येते की ज्यांचे रक्तदान करून 3 महिन्याच्या वर कालावधी होऊन स्वैच्छिक रक्तदानाची इच्छा असेल.
          त्यांनी माझ्याशी संपर्क करावे कारण तुमचं रक्त योग्य वेळी गरजू गरीब रुग्णाला कामी येईल.

प्रफुल भोयर- 7057586468
रक्तविर बहुउद्देशिय संस्था
🩸🩸🩸🩸🩸🩸

04 January 2021

आदरणीय नगरसेवक नितिनदादा मिर्झापुरे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा🎂

आदरणीय नगरसेवक नितिनदादा मिर्झापुरे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा🎂

चळवळीतून व्यापकतेकडे....
             सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील एक यशस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांचं नाव आदरपूर्वक घेतलं जाते असे नितीनदादा मिर्झापुरे. याला कारणही तसंच आदरणीय आहे. ज्या वयात स्वतःचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले जातात त्या वयात नितीन दादांनी केलेल्या कार्याची दखल एका महान कार्यात मोडते.समाजाचा विकास नवी पहाट घेऊन उदयास यावा ही संकल्पना घेऊन समाज सेवेस उतरलेले नितीनदादा स्वतःला समाजास वाहून नगरसेवक बनले. त्यांच्या चांगल्या कार्याने आज सर्वच यवतमाळकर त्यांना सॅल्युट करतात. परिस्थिती कशीही असो पण आपण मात्र सदैव तयार. संकट असो,आनंद असो की हर्षोल्हास  तुम्ही घेतलेला निर्णय आजपर्यंत सर्वमान्यच ठरला आहे. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा कुणीही येवो नितीन दादांचा हात मदतीसाठी पुढेच असतो. नितीनदादांच्या सुरवातीच्या करकीर्दीपासून ते आजपर्यंत त्यांच्या हातून घडलेल्या सेवेने चारचौघांच्या चेहऱ्यावर हास्याची लहर अलगत उमटलेली  मी पाहिली आहे. कोरोना महामारीच्या काळातही त्याची सेवा प्रशंसनीय आहे.नितीन दादांच्या आयुष्याचाच अर्थ एवढा व्यापक आहे की त्यांच्या प्रत्येक स्पंदनात मानवता सामावलेली आहे.काही मानसांत नाते जरी रक्ताचे नसले तरीही माणुसकीच्या नात्याने रक्त देण्यासही मागेपुढे विचार न करणारे महान विचार नितीनदादांकडे आहे. नितीनदादासारखे मित्र भेटल्याने माझेही नाव भाग्यवान च्या यादीत आले असे मला वाटते. रक्तवीर,समाजाचा आधारस्तंभ,  रक्तमित्र, रुग्णमित्र, अन्नदान, वस्त्रदान, रुग्णवाहिका, शिवतीर्थ चे सदस्य,रुग्णवाहिका देणारे, जिथे अन्याय तिथे प्रहार करणारे तडफदार युवा नेतृत्व नितीनदादा पुन्हा एकदा तुम्हाला सॅल्युट!
               -प्रफुल्ल भोयर
              7057586468

#दादा #खास तुमच्यासाठी माझी ही छोटीशी #कवितेची भेट...!

#वेध_भविष्याचा.....!

निश्चयाची घेऊन दोरी
केली ध्येयाची तयारी
साथ आहे शिक्षणाची 
गरज नाही मागे वळण्याची
कधी न पसरले हात मागण्या 
सवय आत्मसात केली देण्याची
चटके बसले व्रणही पडले
पण आणला अर्थ जगण्याला
समाज सेवा करिअर समजुन
कसं जगायचं टाकलं ठरवुन 
विकासाची आणण्या पहाट
घेतला वेध भविष्याचा
अपयशापुढे तग धरुन 
दिली उभी राहण्याची प्रेरणा
टिकवून ठेवले आपले सामर्थ्य
संयम न ढाळता
हुंकारातील तळमळतेने
जागविली अपुली चेतना
               ✍🏻  -प्रफुल भोयर
                     7057586468

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...