03 October 2020

उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा भास्कर...! 🎂💐🎊🇮🇳

सलाम तुझ्या निश्चयाला
प्रखर तुझे तेज भास्करा।।
उत्साह ध्येयाने भारुन
पोहोचलास तू यश शिखरा ।।

          महाराष्ट्रातले बरेच तरुण बघतात, तसच एक स्वप्न त्यानही बघितलं. खाच-खडग्यातून वाट काढत जीवनाच्या परीक्षेत उतरताना याची जाणीव ही नव्हती की आपणही आपल्या ध्येयात यशस्वी होऊ. पण त्याच्या प्रयत्नाची पराकाष्ठा त्याला यशापर्यत घेऊन गेली. मेहनतीच्या जोरावर भारतीय सेनेत भरती होणारा भास्कर ठाकरे वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी देशसेवेसाठी सज्ज झाला.
          भास्कर माझा जिगरी दोस्त, सोबतच शिकलो त्यामुळे एकमेकांना जाणून घेण्यासाठी वेगळ काहीही करावं लागलं नाही. एकाच बेंचवर बसून आमचे College चे दिवस गेले. अभ्यासातही आमच्यापैकी कोणी पुढे मागे नव्हते. काँपिटीशनच्याही भानगडीत आम्ही कधी पडलो नाही. एक समंजस व पवित्र मैत्रीने आम्हाला सदैव जोडूनच ठेवलं. भास्कर लहानपणापासूनच हुशार मुलगा. गरिबीतूनच शिक्षण घेतलं. कष्टाच्या दिवसातही खचून न जाता आपल्या कुटुंबाचा आधार बनला. नकारात्मकता त्याच्या मध्ये कधी दिसलीच नाही. तो नेहमी आनंदी असतो. भास्कर जिथे कुठे जाईल तिथे त्याच्या येण्यान वातावरण अगदीच ताजतवाण होऊन जाते. मित्रांचा लाडका भास्कर स्वभावाने प्रेमळ व कणवाळू आहे. अतिशय उत्कृष्ठ असा वक्तृत्व गुण त्याच्यामध्ये आहे. त्याच्या ओघवत्या भाषण शैलीने कॉलेजमध्ये सर्वांच्या मनावर राज्य करायचा. मित्रांच्या अडचणी सोडवण्यात एकदम पटाईत असणारा भास्कर आज स्वतःला देशसेवेत अर्पण करीत आहे. आपण कुणाच्या तरी कामी यावे असं तो माझ्याजवळ नेहमीच म्हणायचा. म्हणून त्याने कॉलेज काळातच रक्तदान करणे सुध्दा चालू केलं तेही स्वैच्छिक. स्वतःपेक्षा इतरांचा विचार करणारा भास्कर भारतीय नागरिकांचा संरक्षक म्हणून जगेल, यापेक्षा दुसरा अभिमान कोणता असेल ?
मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तू जे काही करतो आहेस ते योग्यच आहे.
( जीवनाच्या प्रत्येक क्षणी तू यशस्वी व्हावा, आनंदीत असावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. )

✍🏻 प्रफुल्ल भोयर (मुकुटबन)
         7057586468
          04/10/2020

कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...