रक्तदान म्हणजे जिवनदान. आजच्या युगात रक्त हा सर्वात बहुमूल्य घटक आहे. गरजु गरीब गर्भवती महिला, अपघातग्रस्त रूग्ण, आजारामुळे रक्ताची कमतरता असे कित्येक रूग्ण यांना रक्तदाते उपलब्ध करून देण्याचे कार्य रक्तविर बहुउद्देशीय संस्था नावाने सोशल मिडीया वरून कार्य सुरू आहे. तसेच सोशल मिडीयीमधुन लिंक बनवुन एक जोड बनविली व मिञमंडळी च्या सहाय्याने आपापल्या जिल्ह्यातील गरीब गरजु रूग्णाकरीता रक्तदाते उपलब्ध करून दिले गेले आहे व तसेच दिले जात आहे. कधि रक्तदाते तर कधि ब्लड बैंकेतुन रक्त उपलब्ध करून देण्याचे कार्य रक्तविर बहुउद्देशीय संस्था करीत आहे. गरीब गरजु रूग्ण हे उपचाराकरीता रक्ताची गरज पडल्यास सरकारी जिल्हा रूग्णालय गाठतात. आणि ज्यावेळेस रक्त पाहीजे अशी पोस्ट येते त्यावेळेस हे युवक सहकार्य घेत साथ देत रक्तदाते शोधुन त्या रूग्णाकरीता उपलब्ध करून देतात. असेच देशहिताचे कार्य हे युवक अतिशय निस्वार्थपणे गेली कित्येक दिवस करीत आहे. आणि याच निस्वार्थ रक्तदान क्षेञाची समाजसेवा करीता महाराष्ट्र राज्यात व तसेच इतर राज्यात देखील सत्कार करण्यात आला. आणि हेच रक्तदान क्षेञातील उत्कृष्ट कार्य आज या युवकांचे भारत भर पसरिले आहे. व याच उत्कृष्ट कार्याकरीता युवक प्रफुल भोयर आणि प्रियल पथाडे मुकूटबन यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार रक्तदान क्षेञात कार्य करणाऱ्या प्रत्येक ब्लड कोओर्डीनेटर व ब्लड डोनर यांचाच आहे. संपूर्ण भारत देशातिल रक्तदान क्षेञात कार्य करणाऱ्या कित्येक विविध संस्था व कार्यकर्ते यांना आमंत्रित करून या राष्ट्रीय पुरस्कार ने सन्मानीत करण्यात आले. सर्वात कमि वयोगटातील महाराष्ट्र मधिल या युवकांची हि टिम अतिशय आकर्षित व नावलौकीक ठरली. हा राष्ट्रीय पुरस्कार समारंभ सोहळा राज्यस्थान मधिल हनुमानगढ येथे ह्युमन सोशल फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आला होता. या राष्ट्रीय पुरस्कार समारंभ सोहळा दरम्यान माजी मंञी डॉ. रामप्रताप, उपजिल्हाधिकारी सहीप्रसाद भावसार, एच. एस. एफ चे सचिन सिंगला, गगन अरोरा, एन. बि. टि. सी. चे उपनिर्माते तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
https://www.facebook.com/100012958780815/posts/741914172917202/?substory_index=0&app=fbl