30 July 2019

#विदर्भरत्नांचा_मध्यप्रदेशात_उज्जैन_येथे #सत्कार❣

#विदर्भरत्नांचा_मध्यप्रदेशात_उज्जैन_येथे #सत्कार❣     


             मध्यप्रदेशातील उज्जैन येथेे पाच विदर्भरत्ननाचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्र ब्लड गृप आणि रक्तविर बहुउद्देशीय संस्था यांचे अभिषेक ठाकुर अमरावती, चैत्यन तेलरांधे वर्धा, सागर ईळकर चिमूर, प्रियल पथाडे मुकुटबन आणि प्रफुल भोयर मुकूटबन इत्यादी विदर्भवीरांचा समावेश होता. 
          रक्तदान- जीवनदान या संकल्पनेतून  विदर्भातील काही युवकांनी आपलाएक ग्रुप तयार करून संपूर्ण भारतातील गरीब व गरजु रुग्णांना त्वरीत व मोफत रक्तपुरवठा केला जातो. या गृप चा नेतृत्व करणाऱ्या या युवकांनी आपल्या कार्यातून आज पर्यत असंख्य रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करून कित्येकांचा जिव वाचविला. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता, निस्वार्थी पणे रुग्णांच्या मदतीला धावून गेले. यांच्या कार्याची  पावती म्हणुन सन्मानीय रक्तमित्र मांगीलला सोलंकी (राष्ट्रीय मानवाधिकार एवं सामाजिक न्याय संघटन प्रदेश सचिव मध्यप्रदेश) यांनी रक्तदान क्षेत्रात बहुमोल कार्य करणाऱ्या या विदर्भरत्नानचा सत्कार घडवुन आणला. 
          यांच्या शुभहस्ते या प्रसंगी प्रमुख अतिथी तहसीलदार आर के गुवा, आकांशा समाचार चिफ ब्युरो सुनील शर्मा, जनपद सदस्य गोपाल दास बैरागी, राष्ट्रीय मानवाधिकार तथा रक्तमित्र मंगीलाल सोलंकी यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विदर्भरत्नानचा गौरव करण्यात आला, आणि सर्वांना भविष्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या..
                            प्रफुल भोयर (मुकूटबन)
                               7057586468




कायदेविषयक साक्षरता आणि जनजागृती अभियान....

प्रयत्न करुया सगळे संपविण्या निरक्षरता गरज आहे काळाची कायदे विषयक साक्षरता  ◆ कायदेविषयक  साक्षरता आणि  जनजागृती अभियान यवतमाळ:- लक्ष्मीबाई ...